विक्रम जाधव याला विद्यार्थ्यांशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी अलिबागचे विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अलिबाग – नवीन पनवेल येथील खासगी क्लासचा शिक्षक विक्रम जाधव याला विद्यार्थ्यांशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी अलिबागचे विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नवीन पनवेल येथील सेक्टर १९ परिसरात गुरुकुल कोचिंग क्लासमध्ये पीडित विद्यार्थी जात होता. या क्लासमध्ये विक्रम संस्कृत विषय शिकवत होता. विक्रम आपल्या मुलाशी लैंगिक चाळे करत असल्याची फिर्याद पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार विक्रम जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून खांदेश्वर पोलिसांनी अटक केली होती.
त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपत्रही दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. महेश मधुकर ठाकूर यांनी बाजू मांडली. सर्व साक्षीपुरावे पाहून विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी विक्रम जाधव याला दोषी ठरवले.
ह्या विक्रम जाधवची तुरुंगात चामडी सोलून काढा भडव्या ची !