खालापूर टोल नाक्यावर मुंबई- कोल्हापुर एसटीतून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ४० लाखांची रोकड जप्त केली असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई- खालापूर टोल नाक्यावर मुंबई- कोल्हापुर एसटीतून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ४० लाखांची रोकड जप्त केली असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईहून कोल्हापुरला जात असलेल्या एसटी बसची खालापूर टोल नाक्यावर झडती घेऊन पोलिसांच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई करत ४० लाख रुपये जप्त केले.
मुंबई सेंट्रल येथून कोल्हापुरला निघालेल्या एमएच ०६ एस ८९५४ या निम आराम बसमधून एक सुटकेस आणि लेदर बॅगमधून हे पैसे दोघेजण सांगलीला घेऊन निघाले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
बरे झाले . sagalyach bas tapasa .