सिंधुनगरी जिल्ह्यात सध्या रिक्त असलेल्या ५१ पोलिस पदांसाठीची ऑनलाइन भरती प्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू होत आहे.
सिंधुनगरी – जिल्ह्यात सध्या रिक्त असलेल्या ५१ पोलिस पदांसाठीची ऑनलाइन भरती प्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. तर राज्य सरकारने मंजूर केलेल्या नवीन पदांची भरती मागाहून होईल. या वर्षात आणखी दोनदा भरती प्रक्रिया होणार असल्याचे सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रांवर उमेदवारांना मोफत अर्ज करण्याची सुविधा आहे. ही सुविधा ३० एप्रिलपर्यंत सुरू राहील. खुल्या प्रवर्गातील १५, महिला १४, खेळाडू दोन, प्रकल्पग्रस्त दोन, भूकंपग्रस्त एक, माजी सैनिक सात, अंश पदवीधर चार, गृहरक्षक दल दोन, अनुकंपातील मिळून अशा एकूण ५१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या निवडीबरोबरच प्रत्येक प्रवर्गात १० टक्के प्रतीक्षा यादीही तयार केली जाणार आहे.
सध्या पोलिस दलात रिक्त असलेल्या पदांसाठीच ही भरती प्रक्रिया होत आहे. तर राज्य सरकारने नव्याने मंजूर केलेल्या पोलिस आस्थापनेनुसार जिल्ह्यासाठी नवीन पदे अद्याप निश्चित झालेली नाहीत. लवकरच ही पदे निश्चित झाल्यानंतर सहा ते सात महिन्यांमध्ये नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया होईल. अर्ज करताना उमेदवारांना अडचणी ०८८७९९५८३९७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्रिमुख यांनी केले आहे.
मरिन अकॅडमीतर्फे पोलिसांना प्रशिक्षण
जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेबाबत पोलिस दल सतर्क आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील पोलिस दलास विविध प्रशिक्षणे देण्यात येत आहेत. तर काही पोलिसांना मुंबई येथे मरिन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
hi sir i am kishan Baburao Devde