भारताला पुरुषांच्या २१ वर्षाखालील सुलतान जोहार चषक हॉकी स्पर्धेत रविवारी गतविजेतेपद राखण्याची संधी आहे.
जोहार बाहरु – भारताला पुरुषांच्या २१ वर्षाखालील सुलतान जोहार चषक हॉकी स्पर्धेत रविवारी गतविजेतेपद राखण्याची संधी आहे. भारताची अंतिम फेरीत ब्रिटनशी लढत आहे. भारताने शनिवारी हरमनप्रीत सिंगच्या हॅटट्रिकच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या साखळी लढतीत ६-२ मोठा पराभव केला.
या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांतून चार विजयांसह अंतिम फेरी गाठली. हरमनप्रीतचा भन्नाट फॉर्म हा भारताचे स्पर्धेतील यशाचे मुख्य कारण आहे. त्याने स्पर्धेतील दुसरी हॅटट्रिक नोंदवण्यात शनिवारी यश मिळवले. हरमनप्रीतने याआधी गुरुवारी मलेशियाविरुद्धही हॅटट्रिक नोंदवली होती. आक्रमक खेळ हे भारताच्या ऑस्ट्रेलियावरील विजयाचे वैशिष्टय़ ठरले.
भारताला या स्पर्धेत एकमेव पराभव ब्रिटनकडूनच स्वीकारावा लागला आहे. ते पाहता त्या पराभवाची परतफेड करण्याचे आव्हान भारतासमोर रविवारी असेल. हरमनप्रीतप्रमाणेच वरुण कुमार, परविंदर सिंग आणि पवन कुमार यांच्याकडून गोलची अपेक्षा आहे. त्यातच ब्रिटनने साखळीतील पाचही लढती जिंकल्या आहेत. दु. ३:२५वा. स्टार स्पोर्ट्स १
इंडिया व्ही आर प्रौड ऑफ यु