राज्यात आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या कामात महत्त्चाची भूमिका बजावत असलेल्या राज्यातील आशा, गटप्रवर्तक आणि अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर संघटनेच्या महिलांनी मंगळवारी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले.
मुंबई- राज्यात आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या कामात महत्त्चाची भूमिका बजावत असलेल्या राज्यातील आशा, गटप्रवर्तक आणि अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर संघटनेच्या महिलांनी मंगळवारी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले.
राज्य सरकारने आशा वर्करच्या मानधनात अनेकदा वाढ करण्याचे जाहीर आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे हजारो आशा वर्कर, गटप्रवर्तक महिला उपेक्षित राहिल्या असल्याचे या वेळी आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आले. या आंदोलनात राज्यभरातून आशा वर्कर मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
पश्चिम बंगालप्रमाणे राज्य सरकारने आशा वर्करला मानधन सुरू करावे, रोग्यांसोबत राहणा-या सर्व आशा वर्कर यांना जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी, ग्रामीण पातळीवर आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे, आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
दरम्यान, संघटनेच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची भेट घेतली असता आशा वर्करला केंद्राकडून मिळणा-या मानधनात त्याच प्रमाणात वाढ करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संघटनेच्या शुभा शमीम यांनी दिली.
अशा वर्कर्सना कायम करून घेऊन त्यांना योग्य ते मानधन देण्यात यावे कारण अशा वर्कर्स फार मोठी जबाबदारीची कामे करत आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला मासिक वेतन हे मिळालेच पाहिजे .