शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी समितीची स्थापना केली जावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.
मुंबई – शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी समितीची स्थापना केली जावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.
न्यायमूर्ती ए.एस.ओका आणि ए.पी.भंगाळे यांच्या या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. सोशल कार्यकर्ते सय्यद रिझवी यांनी अनधिकृत बांधकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले.
अनधिकृत बांधकामांसंबंधित वारंवार तक्रारी दाखल केल्या जात असूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप रिझवी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. या याचिकेत मढ आणि मार्वे भागात ३२ अनधिकृत असल्याची माहिती या याचिकेतून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी दोन आठवड्यात समिती स्थापन करुन यासंबंधीचा अहवाल येत्या सहा आठवड्यात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिले.
Kalwa kharegaon there is lot of illegal constructions.
Please do something. Shiv Sunder Heights Nr Parsik Bank.
Lots of water problems.