मुंबई महापौरांच्या वाहन खर्चावर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असून एका वर्षालाच तब्बल २६ लाखांचा खर्च होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई – मुंबई महापौरांच्या वाहन खर्चावर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असून एका वर्षालाच तब्बल २६ लाखांचा खर्च होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
एकीकडे जकातीचे महसूल कमी होणार असल्याने मुंबईकरांच्या खिशात हात घातले जात असतानाच महापौरांच्या सेवेत असलेली तीन वाहने, त्यांचे चालक आणि इंधनावर हा खर्च होत आहे. त्यामुळे करदात्यांच्या खिशात हात घालण्याऐवजी महापौरांसह उपमहापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या वाहन खर्चावरही कपात करून बेसुमार खर्चाला आळा घातला जाईल का, असा सवाल केला जात आहे.
मुंबईच्या महापौरांच्या दिमतीला ३ वाहने असून १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत महापौरांच्या वाहनासाठी २०९२ लिटर एवढय़ा इंधनाचा वापर करण्यात आला. इंधन वापरासाठी यंदा २ लाख ८० हजार ७८६ रुपयांचा खर्च करण्यात आला होता.
विशेष म्हणजे एक वर्षाचे महापौरांच्या तीन वाहनचालकांचे ओव्हरटाईम हे १३ लाख ९४ हजार रुपये एवढे असून या सर्वासाठी तब्बल वर्षाकाठी २६ लाख रुपये खर्च केले जातात. महापौरांच्या दिमतील असलेल्या तीन वाहनांत एक त्यांच्या स्वत:साठी, एक त्यांच्या कुटुंबासाठी आणि एक सुरक्षारक्षकांसाठी असा त्यांचा ताफा असतो.
परंतु महापौरांच्या वाहनासाठी जिथे २६ लाख रुपये खर्च केले जातात, तिथे उपमहापौरांच्या वाहन खर्चासाठी १० लाख रुपयांचा खर्च केला जात असल्याची किशोर जोशी यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
मुंबईकरांवर एकीकडे करवाढीचा बोजा वाढत असताना मुंबई महापौरांनी वाहनांतून फिरत पालिकेच्या तिजोरीतील पैशावर उधळपट्टी करणे योग्य नसून महापौरांनी, महापालिकेची पुढील आर्थिक घडी सुरळीत ठेवण्यासाठी स्वत:पासून काटकसर करायला हवी होती, अशी टीका काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
पण लक्षांत कोण घेतो ???. जय महाराष्ट्र !!!