नागपूरमधील सावनेरच्या भाजप उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने भाजपला फटका बसला आहे.
नागपूर – नागपूरमधील सावनेरच्या भाजप उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने भाजपला फटका बसला आहे. शासकीय कामाचे कंत्राट घेतल्याने भाजप उमेदवार सोनबा मुसळे यांची उमेदवारी अर्ज निवडणूक अधिका-यांनी रद्द केला.
सोनबा मुसळे हे मुसळे कन्स्ट्रक्शमध्ये भागीदार आहेत. त्यांच्या कंपनीने शासकीय कामाचे कंत्राट घेतल्याचा आरोप मनीष मोहोड यांनी केला होता. मुसळे यांनी शासकीय कंत्राट घेतल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी मोहोड यांनी केली होती.
निवडणूक अधिका-यांनी आरोपांची शहानिशा केल्यानंतर मुसळे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करत असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे भाजपला सावनेरमध्ये फटका बसणार असून, पर्यायी भाजप येथे कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार ते अजून स्पष्ट झालेले नाही.
बरे झाले योग्य निर्णय घेतला .