खोकल्याने हैराण झालेल्या बॉलिवूड मेगास्टार बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे त्यांनी स्वत: ब्लॉगवर म्हटले आहे.
मुंबई- खोकल्याने हैराण झालेल्या बॉलिवूड मेगास्टार बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे त्यांनी स्वत: ब्लॉगवर म्हटले आहे.
सर्दी- खोकल्याच्या त्रासाने बेजार झालेले अमिताभ गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे सर्व शूटिंग रद्द करुन ते घरी आराम करत आहेत. मात्र आता आपल्याला बरे वाटत असल्याचे त्यांनी ब्लॉगवर म्हटले आहे. तसेच ७१ वर्षीय अमिताभने आपल्या तब्बेतीची विचारपूस करणा-या आणि तब्बेत लवकर बरी व्हावी म्हणून शुभेच्छा देणा-या सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
आता कौन बनेगा करोडपती आणि अन्य शुटींगचे रेकॉर्डींग करुन लवकरच आपल्या भेटीला येणार असल्याचे अमिताभ यांनी ब्लॉगवर म्हटले आहे.
गणेशोत्सवापासून बिघडलेल्या वातावरणामुळे सध्या ताप- सर्दी- खोकल्याने मुंबईकरांसह बॉलिवूडचे अनेक कलाकारही त्रस्त आहेत. अमिताभ बच्चन यांनाही खूप सर्दी-खोकला झाला होता. एरव्ही कोणत्याही कारणामुळे शूटिंगमध्ये खंड पडू न देण्याची काळजी घेणा-या बिग बी यांना खोकल्यामुळे त्यांच्या आगामी ‘पिकू’ सिनेमाचे शूटींगही रद्द करावे लागले. शूटिंग रद्द केल्याने अमिताभ यांना खूप वाईट वाटल्याचे त्यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.
कौन बनेगा आरोग्य पती ??? करोड पती कि अब्जोपती ????????????.हेल्थ इस वेल्थ ! नॉट a वेल्थ इस हेल्थ !