‘एनएच १०’ मधील भूमिकेसाठी अभिनेत्री अनुष्का शर्माचे समीक्षकांसह सर्वांनीच भरभरुन कौतुक केले. अनुष्काचे हे यश फक्त अभिनेत्री म्हणून नसून, निर्माती म्हणूनही आहे.
बिजींग – ‘एनएच १०’ मधील भूमिकेसाठी अभिनेत्री अनुष्का शर्माचे समीक्षकांसह सर्वांनीच भरभरुन कौतुक केले. अनुष्काचे हे यश फक्त अभिनेत्री म्हणून नसून, निर्माती म्हणूनही आहे.
या चित्रपटाच्या यशाने भारावलेल्या अनुष्काने भविष्यातही दमदार पटकथा असेल तर, निर्माती म्हणून आपल्याला धोका पत्करायला आवडेल असे म्हटले आहे. बिजींग चित्रपट महोत्सवात एनएच १० प्रदर्शित होणार असल्याने अनुष्का येथे आली आहे.
अभिनेत्री ते निर्माती हा प्रवास खरोखर सुंदर असल्याचे अनुष्काने म्हटले आहे. तिने या चित्रपटाच्या यशाचे श्रेय दिग्दर्शक नवदीप सिंग आणि लेखक सुदीप शर्मा यांना दिले आहे. या महोत्सवाला आलेल्या अनुष्काचे इथल्या भारतीयांनी जोरदार स्वागत केले.
काय हो… ह्या bayek itkya dokyavar ghevchi kay garaj aasa???