माझ्या सारख्या अपंगाला इथे जागा नाही असे सांगत द्रमुक प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी गुरुवारी तामिळनाडू विधानसभेच्या आवारातून निघून गेले.
चेन्नई – माझ्या सारख्या अपंगाला इथे जागा नाही असे सांगत द्रमुक प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी गुरुवारी तामिळनाडू विधानसभेच्या आवारातून निघून गेले.
सत्ताधारी अण्णाद्रमुकने करुणानिधी यांच्यावर मागच्या तीन वर्षांपासून विधानसभा अधिवेशन टाळत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे करुणानिधी विधानसभेमध्ये आले होते.
विधानसभेमध्ये मला व्यवस्थित आसन व्यवस्थेची हमी मिळाली तर, मी आनंदाने सभागृहामध्ये उपस्थित राहीन असे करुणानिधी अण्णाद्रमुकच्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले होते.
अण्णाद्रमुक सरकारने सभागृहात माझ्या बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही त्यामुळे मला सभागृहात निमंत्रित करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही असे विधानसभेतून निघण्यापूर्वी करुणानिधी यांनी सांगितले.
विधानसभेत मी का उपस्थित राहू शकत नाही हे मी यापूर्वी दोनवेळा स्पष्ट केले आहे असे करुणानिधी म्हणाले. २००९ लोकसभा निवडणुकीपूर्वी करुणानिधी यांच्या पाठिच्या कण्यावर शस्त्रक्रिया झाली होती.
अरे म्हातार्या ! आयुष्य भर खूप माल कमावालास आता राम नाम जपत बस !!!