मधुमेह हा आजार झालेल्या व्यक्तींसाठी आहार ठरवणे अवघड असते. त्यांना केवळ गोड पदार्थच नव्हे तर अनेक पदार्थाचा त्याग करावा लागतो आणि कायम विविध प्रकारचे पथ्य पाळावे लागते.
मधुमेह हा आजार झालेल्या व्यक्तींसाठी आहार ठरवणे अवघड असते. त्यांना केवळ गोड पदार्थच नव्हे तर अनेक पदार्थाचा त्याग करावा लागतो आणि कायम विविध प्रकारचे पथ्य पाळावे लागते. मात्र, ज्या व्यक्तींना मधुमेह असतो त्या व्यक्तींनी दिवसभरात अनेक वेळा थोडे थोडे खाण्यापेक्षा एकदाच भरपूर जेवण घेणे चांगले असते, असे नव्या संशोधनात आढळले आहे. मधुमेही व्यक्तींसाठी भूमध्य सागरी भागातील लोक जो आहार घेतात तो सर्वोत्तम असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. या आहारात सकाळच्या न्याहरीचा समावेश नसतो.
स्वीडनच्या लिंकओपिंग विद्यापीठाच्या संशोधकांनी रक्तातील ग्लुकोज, रक्तातील लिपिड घटक आणि विविध हॉर्मोन्स आदींचा अभ्यास केला. दुपारच्या जेवणानंतर या सर्व घटकांचा अभ्यास केला गेला. ‘टाइप-२’चा मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये या सर्व चाचण्या करण्यात आल्या.
मधुमेहाच्या २१ रुग्णांना संशोधकांनी कमी कबरेदके, कमी स्निग्धांश आणि भूमध्य समुद्री भागातील लोकांचा म्हणून ओळखला जाणारा आहार दिला. प्रत्येक न्याहरीनंतर त्यांची रक्तचाचणी करण्यात आली. नॉर्डिक देशांमध्ये पारंपरिकरीत्या कमी स्निग्धांश असलेला आहार घेतला जातो. या आहारातून ५५ टक्के स्निग्धांश मिळतात.
मेडिटेरेनिअन आहारात न्याहरीसाठी केवळ ब्लॅक कॉफी घेतली जाते. त्यामुळे न्याहारीतून मिळणारे सर्व प्रकारचे उष्मांक हे जेवणातून घेतले जातात. या भोजनात फ्रेंच रेड वाइन वापरली जाते. यातून महिलांना १५० मिली व पुरुषांना २०० मिलीच्या ग्लासमधून उष्मांक मिळतात.
मेडिटेरिनिअन आहारात कबरेदकांचे प्रमाण अधिक असते. यात ऑलिव्ह तेल व माशांचा वापर केला जातो. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे या भागातील लोक न्याहरी करत नाहीत आणि वाइनसोबत खूप जास्त प्रमाणात जेवण घेतात. तरीही कमी स्निग्धांश असलेल्या जेवणामुळे रक्तातील ग्लुकोजची जी पातळी राखली जाते तीच पातळी या खूप जास्त प्रमाणातील भोजनामुळेही कायम राहते. किंबहुना त्या पातळीचे उल्लंघन होत नाही. यातून असे सूचित होते की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी थोड्या थोड्या वेळाने खाण्यापेक्षा एकाच वेळी भरपूर खाणे योग्य आहे, असे संशोधक डॉ. हॅन्स गुल्डब्रॅँड आणि प्रा. फ्रेड्रिक निस्ट्रॉम यांनी सांगितले.
madhumeh ha ajar bryach lokanna aahe. ha lekh upyogi aahe. madhumehinni nasta n karta bharpur aahar ghyava.