जगविख्यात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर यांची डॉ. येलावर्ती नयुदम्मा स्मरणार्थी पुरस्कार २०१३ यासाठी निवड करण्यात आली आहे.
हैदराबाद – जगविख्यात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांची डॉ. येलावर्ती नयुदम्मा स्मरणार्थी पुरस्कार २०१३ यासाठी निवड करण्यात आली आहे.
खगोलशास्त्रातील त्यांनी दिलेल्या महत्तवपूर्ण योगदानाचा गौरव म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. नयुदम्मा यांना श्रद्धांजलीच्या रुपात देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोलाचे योगदान देणा-या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो. १९८६ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली.
चार वर्षांहूनही अधिक काळ जयंत नारळीकर यांचे अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रात संशोधन सुरु आहे. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं आहे. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो `हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे.
I have attended your Prahaar-Bhushan Prize distribution function on dated 23.02.2014. This function was well organised by your team. this function is one of the beautiful and rare among all the prize distribution, because the persons that you have elected were from middle class family and real heros . you have set an example of Ideal prize distribution from the print media……Again i congratulate to you…………………