वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून नारायण राणे यांची उमेदवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर केली.
नवी दिल्ली- १७६ वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची उमेदवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे जाहीर केली.
अ. भा. काँग्रेस समितीतर्फे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी या निर्णयाची माहिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना दूरध्वनीवरून दिली. यानंतर चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे असे जाहीर केले की, १७६ वांद्रे पूर्वसाठी सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना दिली आहे. नारायण राणे हे या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील. तसे पत्रक प्रदेश काँग्रेसतर्फे रात्री उशिरा प्रसिद्धीस देण्यात आले.
दरम्यान, अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती सुमनताई रावसाहेब पाटील (आर. आर. पाटील यांच्या पत्नी) यांना काँग्रेसचा पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. ही पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार नाही.
नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्री. राणे यांनी पक्षश्रेष्ठींचे मनपूर्वक आभार मानले आहेत. श्रीमती सोनिया गांधी यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे तो सार्थ ठरवीन आणि काँग्रेसला विजय मिळवून देईन, असे त्यांनी सांगितले. श्री. राणे मंगळवार, २४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत हीच आहे.
[EPSB]
नारायण राणे यांना शरद पवार यांचा पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
[/EPSB]
वोटिंग मशीन मध्ये चीटिंग करून भा ज प सत्तेवर आली.चीटिग करणारे मुंडे आज नाहीत.वोटिंग मशीन मध्ये चीटिंग होणार नाही याची काळजी घेतली तर कोकणच्या दादाचे विजय नक्की.जर वोटिंग मशीन मध्ये चीटिंग झाले तर कोकणच्या दादाचा पराभव नक्की.विदेशात वोटिंग मशीन बदनाम आहेत म्हणून तिथे पेपर वापरतात.