उत्तर प्रदेशमधील उनाऊ इथल्या राजा राव रामबक्ष सिंहच्या किल्ल्यात गेल्या दोन दिवसांपासून तब्बल एक हजार टन सोन्याचा शोध सुरु आहे.
उनाऊ(उत्तर प्रदेश)- उत्तर प्रदेशमधील उनाऊ इथल्या राजा राव रामबक्ष सिंहच्या किल्ल्यात गेल्या दोन दिवसांपासून तब्बल एक हजार टन सोन्याचा शोध सुरु आहे. हा शोध घेणारी मंडळी आहेत पुरातत्व विभागातील अधिकारी, आणि त्यांना हा आदेश दिला आहे खुद्द केंद्र सरकारने तेही एका स्वप्नावर… होय एका स्वप्नावर.
त्याचे झाले असे की एका साधूला स्वप्न पडले, म्हणे त्या स्वप्नात राजा राव रामबक्षने आपल्याला त्या किल्ल्यात लपवून घेवलेल्या सोन्याची माहिती दिली. या साधूने ती माहिती केंद्रीय कृषी आणि अन्नप्रक्रिया राज्यमंत्री चरणदास महंत यांनी दिली. आणि मग त्यांनी थेट खोदकामाचे आदेश दिले.
या भारत देशात साधू संतांच्या नदाला लागून विज्ञान वादी दृष्टीकोन आपण विसरून चाललो आहोत पुन्हा एकदा हा भारत देश अधोगतीला जाताना दिसतोय याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत कोणीपण साधू महाराज काय पण सांगणार अन आपण त्या अडानी साधूच्या नदाला लागून या राष्ट्राची संपत्ती लुटणार काय म्हणावे या दळभद्री पणाला….