दिवाळीचा सण खरं तर आपल्या नातेवाइकांचे तोंड गोड करून नात्यात गोडवा निर्माण करण्याचा सण.. म्हणूनच या दिवाळीत गोड गिफ्ट देऊन आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींमध्ये ‘गोऽऽड व्हा’चा हा खाद्य मंत्र..
पूरणमलची रंगीबेरंगी मिठाई
नरक चतुर्दशी असो की लक्ष्मीपूजन, पाडवा किंवा भाऊबीज घरातल्यांचं तोंड गोड करायला मिठाईशिवाय पर्याय नाही म्हणूनच पूरणमल मिठाईवाला घेऊन आले आहेत रंगीबेरंगी मिठाई. या मिठाईत ग्रे काला खट्टा पेढा, रेड रोझ मिठाई, ऑरेंज डिलाइट, ग्रीन पिस्ता बर्फी, पिकॉक ग्रीन रोल, पर्पल ब्लॅक करंट, ब्लू लगून मिठाई, यलो कलाकंद या नवनवीन मिठायांचा समावेश आहे. कालाखट्टा मिठाईमध्ये कालाखट्टा वापरण्यात आला आहे. गुलांबापासून बनवलेली रेड रोझ मिठाई जेवढी चवीला उत्तम तेवढीच दिसायलाही उत्तम आहे. या सर्व मिठायांमध्ये नैसर्गिक फळांचे रस आणि क्रश यांचा वापर केला आहे. प्रत्येक मिठाईमध्ये तिच्या नावाप्रमाणेच नैसर्गिक चव चाखायला मिळणार आहे.
या सर्व मिठाई पूरणमलच्या जुहू, घाटकोपर, मुलुंड भागातील दुकानात उपलब्ध आहेत.
मॅड ओवर डोनट्सचे दिवाळी एक्सप्लोजन डोनट्स
डोनट्स म्हटले की चॉकलेट सॉसमध्ये बुडवलेले डोनट्स डोळयांसमोर येतात पण हो, या दिवाळीत मॅड ओवर डोनट्सने जरा हटके डोनट्स खास दिवाळीसाठी आणले आहे. म्हणजे विदेशी डोनट्सबरोबर देशी मिठाईचा स्वाद अशी अफलातून चव तुम्हाला चाखायला मिळणार आहे. मॅड ओवर डोनट्सने बुंदी बॉम्ब, का बुम, कोकनट ब्लास्ट, नट्स ओवर मोहनथाल अशा चार डोनट्स आणले आहेत. डोनट्स त्यावर चॉकलेट सॉस बुंदी असा ‘बुंदी बॉम्ब’ डोनट आहे, मिल्क चॉकलेटच्या जोडीला काजूकतलीची गोडी असा ‘काजू बुम’ डोनट्स आहे. मिल्क चॉकलेट त्यावर मोहनथाल कस्टर्ड ड्राय फ्रूटसची जोड असा ब्लास्ट चाखायला मिळणार आहे नट्स ओवर मोहनथालमध्ये. त्यामुळे विदेशी डोनट्सची देशी चव या दिवाळीत एकदा तरी चाखून पाहावी.
किंमत – ५५ रुपयांपासून
सोन्यात गुंडाळलेला गोडवा
दिवाळी म्हटल्यावर सगळीकडे आनंददायी वातावरण असतं. हा आनंद आपण एकमेकांना वाटत असतो. आपल्या आप्तेष्टांना, प्रियजनांना भेटवस्तू देऊन आपण हा आनंद वाटतो. सध्या दिवाळीच्या भेटवस्तूंमध्ये चॉकलेटला आलेली मोठी मागणी लक्षात घेता दिवाळीसाठी फरेरो रॉशरने कॉर्पोरेट गिफ्टींग बॉक्स तयार केले आहेत. प्रीमियम हेझलनट आणि कोको यापासून बनवलेले हे अप्रतिम चॉकलेट आहेत. ५, १६ आणि २४ नगांच्या पॅकमध्ये हे चॉकलेट्स सर्वच दुकानात उपलब्ध आहेत. या दिवाळीत तुम्हीसुद्धा आपल्या प्रियजनांना सोन्यात गुंडाळलेला गोडवा म्हणजे चॉकलेट गिफ्ट म्हणून देऊ शकता.
किंमत – ५ फरेरो रोशर चॉकलेट पॅक ११० रुपये. १६ फरेरो रोशर चॉकलेट पॅक ३३५ रुपये. २४ फरेरो रोशर चॉकलेट पॅक ६२५ रुपये.
ब्रिटानियाची ‘शुभ कामनाए’ गिफ्टिंग रेंज
या दिवाळीत ब्रिटानियाने नवीन ‘शुभ कामनाए’ही गिफ्टिंग बाजारात आणली आहे. हे गिफ्ट पॅक सुका मेवा, चॉकलेट्स आणि मिठा नमकीन अशा स्वरूपात आहेत. ‘चोको डिलाइट रेंज’मध्ये गुड डे चोको चिप्स, प्युअर मॅजिक, बोरबॉन जिम जम चॉकलेट यांचा समावेश आहे. तर गुड डे पिस्ता बदाम, गुड डे कॅश्यू, गुड डे चोकोनट यांचा समावेश ‘ड्राय फ्रुट डिलाइट’या रेंजमध्ये आहे. मिठा नमकीन रेंजमध्ये बोरबॉन, ५०-५० , लिटिल हार्टस्, गुड डे यांची खारट गोड चव चाखायला मिळणार आहे. याचबरोबर तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी ब्रिटानियाने ‘हेल्दी डिलाइट’ही चौथी रेंज बाजारात आणली आहे. यात डायजेस्टिव्ह, पाच ग्रेन आणि ओट कुकीज अशा आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बिस्किटांचा सामावेश करण्यात आला आहे. गिफ्ट रेंजचे चार पर्याय बाजारात आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही गिफ्ट रेंज नातलगांना भेट देऊ शकता.
किंमत – १०० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत.
खानदानी राजधानीची दिवाळी थाली
या दिवाळीत एक ते पाच नोव्हेंबरमध्ये खानदानी राजधानीच्या सर्व हॉटेलमध्ये तुम्हाला चाखायला मिळणार आहे खास राजेशाही भोग. दिवाळीनिमित्त खानदानी राजधानी घेऊन आली आहे नवनवीन पक्वान्नांनी समृद्ध अशी ‘दिवाळी थाली’. यात सफरचंदाची जिलेबी, टॉमेटो आणि अक्रोड, ड्रयफ्रूट हलवा, दूध पाक, खजूर बर्फी, सुतरफेणीची खीर अशा नवनवीन मिष्टान्नांचा समावेश आहे. तर या मिष्टांन्नाबरोबर तुमच्या तोंडाला पाणी आणणा-या सुरती उंदियो, जोधपुरी सब्जी, जेसलमेरी पंच कूट, राबोडी हरा प्याज, तिलवाले आलू, मकई मिर्चे या पक्वान्नांचीही याला जोड आहे. खानदानी राजधानीच्या सर्व हॉटेल्समध्ये दिवाळीच्या पाच दिवसांत ही थाली उपलब्ध आहे.
certainly like your web-site however you have to check the spelling
on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I to find it
very bothersome to inform the truth on the other hand
I will certainly come back again.
This is a topic which is near to my heart… Best wishes!
Where are your contact details though?