गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाल्यानंतर झालेल्या तपासात स्त्री भ्रुणाचे तब्बल १९ मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सांगली- गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाल्यानंतर झालेल्या तपासात स्त्री भ्रुणाचे तब्बल १९ मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शस्त्रक्रियेचा अधिकार नसतानाही एका होमिओपॅथिक डॉक्टराने या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
मिरजजवळ म्हैसाळ येथे ही घटना रविवारी उघड झाली. दरम्यान, या प्रकरणातील संशयित डॉक्टरने पळ काढला आहे. मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहित तरुणीचा चार दिवसांपूर्वी गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिच्या माहेरच्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
मृत तरुणीचा पती प्रवीण परशुराम जमदाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय व्यावसायिक बाबासाहेब खिद्रापुरेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्वातीला म्हैसाळ येथील भारती रुग्णालय येथे १ मार्च रोजी दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिचा गर्भपात केला.
गर्भपात करताना अतिरक्तस्त्राव झाल्याने स्वातीचा मृत्यू झाला. याची वाच्यता होऊ नये म्हणून प्रवीणने घाईघाईने तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे त्याचा मृत विावाहितेच्या माहेरकडील मंडळी विधी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नक्कीच काही गैरप्रकार आहे असा संशय स्वातीच्या माहेरच्या मंडळींना आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तपासांत गर्भपात करताना स्वाती मरण पावल्याचे प्रवीणने सांगितले. गा गर्भ ओढ्याजवळ पुरल्याच जबाब त्याने दिला. त्यानुसार तपासाला सुरवात केली. पोलिसांनी खोदकामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अपूर्ण वाढ झालेले काही अर्भक सापडले. हे मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत घालून ओढ्याकाठाला मातीत पुरण्यात आले होते. एकूण १९ अर्भकांच्या मृतदेहाचे अवशेष मिळाले आहेत. हे स्त्री अर्भक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
मुलगी नको म्हणून अनेक जण अवैधरित्या गर्भ पाडण्यासाठी या ठिकाणी येत असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून बाबासाहेब खिद्रापुरे आणि त्याची पत्नी हे दोघे या भागात रुग्णालय चालवत होते. या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात केला जात असे. हे दोघेही बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर आहेत.
गर्भपात झाल्यानंतर ओढ्या-काठाला गर्भ पुरला जात असे. पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारातही खोदकाम करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास उप-अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अशा घातक पद्धतीने गर्भाची वाट लावणाऱ्या त्या डॉक्टर दाम्पत्याला कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे .