आयकर विभागाने हुबळी येथे केलेल्या एका कारवाईत हवाला डिलरच्या घरातून ५ कोटी ७० लाख रुपयांच्या नव्या नोटा, ९० लाख रुपयांच्या जुन्या नोटा, आणि ३२ किलो सोने जप्त केले आहे.
कर्नाटक- आयकर विभागाने हुबळी येथे केलेल्या एका कारवाईत हवाला डिलरच्या घरातून ५ कोटी ७० लाख रुपयांच्या नव्या नोटा, ९० लाख रुपयांच्या जुन्या नोटा, आणि ३२ किलो सोने जप्त केले आहे. घरातील बाथरूममधील तिजोरीत या नोटा आणि दागिने लपवल्याचे उघडकीस आले आहे.
बाथरुमच्या टाईल्समागे तिजोरी तयार करून नोटा यात लपवण्यात आल्या होत्या. २००० रुपयांच्या नोटा असलेली ५ कोटी ७० लाखांची रोकड, १०० आणि २० रुपयांच्या नोटा असलेली ९० लाख रुपयांची रोकडेसह ३२ किलो सोने, चांदीही जप्त करण्यात आली. गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील आयकर विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
वेल्लूरला मोटारीत २४ कोटींच्या नव्या नोटा
तामिळनाडू- आयकर विभागाने केलेल्या कारवाईत वेल्लूर येथून एका मोटारीतून २४ कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या. दोन हजार रुपयांच्या या नोटा होत्या. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आयकर विभागाने शुक्रवारी चेन्नईत एका सराफावर कारवाई केली होती. या कारवाईत ९० कोटी रुपये आणि १२७ किलो सोने जप्त केले होते. या वेळी मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाने ही कारवाई केली. मोटारीत १२ खोक्यांमध्ये ही रक्कम होती. प्रत्येक खोक्यात २ कोटी रुपयांची रक्कम आढळली.
साबर मती के संत तुने कर दिया कमाल,! काला धन पकड vaake macha
diya dhammal ! जय हो नमोजी.कि !