‘साउंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट ज्यांच्या वैयक्तिक जीवनावर आधारित होता त्या ट्रॅप कुटुंबातील अखेरच्या सदस्य आणि या चित्रपटात लुईसाची भूमिका साकारणा-या मारिया फान ट्रॅप यांचे नुकतेच व्हरमाँट येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
व्हरमाँट- ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट ज्यांच्या वैयक्तिक जीवनावर आधारित होता त्या ट्रॅप कुटुंबातील अखेरच्या सदस्य आणि या चित्रपटात लुईसाची भूमिका साकारणा-या मारिया फान ट्रॅप यांचे नुकतेच व्हरमाँट येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ९९ वर्षाच्या होत्या.
संपूर्ण युरोपमध्ये हे ट्रॅप कुटुंब त्यांच्या गायनामुळे प्रसिद्ध झाले होते व नाझीव्याप्त ऑस्ट्रियामधून त्यांनी १९३८मध्ये सुटका करून घेतली होती. त्यांच्या कहाणीवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आणि मारिया फान ट्रॅप ‘साउंड ऑफ म्युझिक’मधील लुईसा बनल्या.
एका सांगीतिक टूरवर असताना आणि स्टोवे येथे सुट्टी घालवत असताना हे कुटुंब १९४२मध्ये व्हरमाँट येथे स्थलांतरित झाले. या ठिकाणी या कुटुंबाने एक लॉज सुरू केले आणि अजूनही ते सुरू आहे.
चुकीच्या बातम्या देऊ नका. मारिया या खर्या ट्रॅप कुटुंबातल्या सदस्या होत्या. मुलींपैकी दोन नंबरच्या! त्यांनी कधीही सिनेमात काम केले नव्हते. त्यांच्यावर आधारित सिनेमातल्या पात्राचे नांव लुईझा होते. ती भूमिका दुसर्या मुलीने केली होती.