खुल्या वर्गासाठी एमपीएससीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.
मुंबई- खुल्या वर्गासाठी एमपीएससीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.
यासाठी आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे खुल्या वर्गातील उमेदवारांना २८ वरून ३३ आणि ३३ वरून ३८ अशी वयोमर्यादा वाढ मिळणार आहे.
आमदार राणे यांनी ही वयोमर्यादा वाढविण्यासाठी राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवली होती. तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता. खुल्या प्रवर्गातील हजारो उमेदवारांना यामुळे फायदा होणार आहे.
राणे साहेब
धन्यवाद :
आपल्या मराठी तरुणांसाठी प्रयत्न केल्याबद्दल खूप खूप आभार .साहेब D ड्राफ्ट ची amt कमी झाली असती तर खूप बर झाल असत .