विमान उड्डाणवस्थेत असताना अनेकदा वैमानिक झोपून घेतात. मात्र वैमानिकांची ही झोप प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. मागच्या आठवडयात मुंबईहून ब्रूसेल्सला जाणा-या जेट एअरवेजच्या वैमानिकाची डुलकी प्रवाशांच्या जीवावर बेतू शकली असती.
नवी दिल्ली – विमान उड्डाणवस्थेत असताना अनेकदा वैमानिक झोपून घेतात. मात्र वैमानिकांची ही झोप प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते.
मागच्या आठवडयात मुंबईहून ब्रूसेल्सला जाणा-या जेट एअरवेजच्या वैमानिकाची डुलकी प्रवाशांच्या जीवावर बेतू शकली असती. मात्र युरोपच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वेळीच वैमानिकाला सर्तक केल्याने पुढील अनर्थ टळला.
मागच्या शुक्रवारी मुंबईहून ब्रूसेल्सला चाललेले जेट एअरवेजचे विमान तुर्कस्थानच्या अंकारा हवाई हद्दीतून जात असताना अचानक पाच हजार फूटापर्यंत खाली आले होते. त्यावेळी विमानाचा मुख्य वैमानिक आराम करत होता. मुख्य वैमानिक विश्राम करत असताना त्याच्या जागी सहवैमानिकाने कॉकपीटमध्ये जबाबदारी संभाळायची असते. मात्र सहमहिला वैमानिक आपल्या टॅबलेटवर व्यस्त होती.
विमान खाली आल्याचे या महिला वैमानिकाच्या लक्षातही आले नाही. सर्तक असलेल्या अंकारा एटीसीने तुमचे विमान ३४ हजारफूटावरुन पाच हजार फूट खाली का आले ? असे विचारले असता सहवैमानिकाचे त्या सूचनेकडे लक्ष गेले. त्यानंतर मुख्य वैमानिकाने विमानावर तात्काळ नियंत्रण मिळवत विमान पुन्हा ३२ हजार फूट उंचीवर नेले.
अतिसंवेदनशील भागातून जाणा-या विमानांवर युरोपियन एटीसीचे अत्यंत बारकाईने लक्ष असते. अनेक हवाई कंपन्या सध्या इराक, युक्रेनचा मार्ग टाळत असल्याने युरोपियन हवाई मार्ग व्यस्त हवाईमार्गांपैकी एक बनला आहे. भारतात हवाई सुरक्षेचे नियमन करणा-या डीजीसीएला मंगळवारी या घटनेची माहिती मिळाली. डीजीसीएने या घटनेची चौकशी सुरु केली आहे.
पायलट झोपी गेला तेंवा सह पायलट असलेली ( बया ) काय अंगाई
गीत म्हणत कि काय ????