लोणावळय़ात सात वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले असून हा प्रकार ज्या कुमार रिसॉर्टमध्ये घडला.
मुंबई – लोणावळय़ात सात वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले असून हा प्रकार ज्या कुमार रिसॉर्टमध्ये घडला तेथील काही कर्मचारी घटनेनंतर फरार झाल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक तपास करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयेशा जैन या सात वर्षीय मुलीचा मृतदेह मंगळवारी दुपारी लोणावळा येथील कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर आढळला होता. या मुलीच्या वैद्यकीय तापसणीनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकणाचा तपास सध्या पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक करत आहेत. त्यांचे एक पथक रोह्याला रवाना झाले असून कुमार रिसॉर्टमध्ये काम करणा-या कर्मचा-यांपासून मालकापर्यंत सर्वाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
चौकशीदरम्यान या रिसॉर्टमध्ये काम करणारे काही कर्मचारी फरार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात रिसॉर्टमधील लिफ्टमन आणि सुरक्षारक्षक फरार असल्याचेही समोर आले आहे. हे रिसॉर्ट भाजपाच्या एका माजी आमदाराचे आहे. असे असले तरी तपासात कोणतेही अडथळे येणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. हे हॉटेल भाडे तत्त्वावर विवाहासाठी घेण्यात आले होते. या सर्व गोष्टी पाहता पुढील तपास होईल. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीएक लागले नाही.
सापडलेल्या नराधमाना कोर्ट कचेरीत न न्हेता पब्लिक. चे हाथी सोपवा ,!!!