महाराष्ट्रातील ४८ खासदारांनीही केंद्रात आवाज उठवून युपीएससीच्या परीक्षा मराठीतून घेण्यास भाग पाडाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई- हिंदी ही राष्ट्रभाषा नसून इंग्रजी व हिंदी या भाषांना झुकते माफ दिले जात आहे. मात्र युपीएससीच्या परिक्षा या मराठीतूनच व्हायला हवी. या परीक्षा हिंदी व इंग्रजीतून घेण्यात येत असल्यामुळे द्रमुक पक्ष ज्याप्रमाणे केंद्रात गदारोळ घालत आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील ४८ खासदारांनीही केंद्रात आवाज उठवून या परीक्षा मराठीतून घेण्यास भाग पाडाव्यात. यासाठी राज्यातील मराठी खासदारांनी या मुद्दयासाठी एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. येणा-या विधिमंडळाच्या अधिवेशनातही मनसेचे आमदार याविरोधात जोरदार आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कृष्णकुंजवर पत्रकार परिषदेतही बोलतांना, केंद्र ही राष्ट्रभाषा नाही, तसे प्रावधान नाही. अहमदाबाद उच्च न्यायालयानेही ही भाषा राष्ट्रभाषा नसल्याचे म्हटले आहे,याचे दाखले देत राज ठाकरे यांनी या भाषांचे बालंट आमच्यावर का असा सवाल उपस्थित केला आहे. राज्यात ४८ खासदार आहेत. त्यांनी केंद्रात आवाज उठवून युपीएसएसीची परीक्षा मराठीतून घेण्यास भाग पाडावे.
राज्यातील मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केंद्रावर दबाव आणून मराठीतून ही परीक्षा घेण्यास भाग पाडावे. जर मराठीतून पेपर सोडविण्याचा फायदा मराठी तरुण, तरुणींना होणार असेल तर त्यांना याचा लाभ का मिळू नये असाही सवाल त्यांनी यावेळी केला. सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण आहे. त्यावेळी मनसेच्या आमदारांच्यावतीने सूचना करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. टाटानी घेतली भेट ही माझ्यासाठी आशिर्वाद होता,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील ४८ खासदारांनीही केंद्रात आवाज उठवून या परीक्षा मराठीतून घेण्यास भाग पाडाव्यात. यासाठी राज्यातील मराठी खासदारांनी या मुद्दयासाठी एकत्र यावे