राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुवरा मुखर्जी यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले.
नवी दिल्ली – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुवरा मुखर्जी यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून सुवरा मुखर्जी आजारी होत्या. सात ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील ए.आर.आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सकाळी १० वाजून ५१ मिनिटांच्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुवरा मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल केल्याने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ओडिसा दौरा रद्द केला होता.
RIP ,!