ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवीन टोयोटा इनोव्हा गाडी विकत घेतली आहे.
मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवीन टोयोटा इनोव्हा गाडी विकत घेतली आहे. महिनाभरापूर्वी १७ मे रोजी त्यांनी आठ वर्षे जुनी स्कॉर्पियो गाडीचा सव्वा नऊ लाखांना लिलाव केला होता.
अण्णांनी नवीन इनोव्हा गाडी घेतली असून पाठीच्या दुखण्याने आजारी असल्याने गाडीच्या आसनांवर अण्णांना हवे ते बदल करून घेण्यात आले आहेत, असे अण्णांचे सहायक दत्ता आवारी यांनी सांगितले. अण्णांचे सहाय्यक अतुल लोखंडे यांनी अहमदनगर येथे जाऊन ९ लाख ११ हजार रुपयांना ही नवी गाडी खरेदी केली.
ही नवीन गाडी पाहण्यासाठी अण्णांच्या चाहत्यांनी राळेगणमध्ये गर्दी केली होती.
प्रचंड प्रमाणात देश सेवा केली आहे आता राम नाम घ्या.दुसय्रानाही देश सेवेची संधी द्या.