‘मी जिवंत राहेन की मरेन, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणातून हटवेन’ अशी प्रतिज्ञा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली.
कोलकाता- ‘मी जिवंत राहेन की मरेन, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणातून हटवेन’ अशी प्रतिज्ञा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली.
नोटाबंदीच्या विरोधात देशातील सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. या विरोधात ममता बॅनर्जी सातत्याने आवाज उठवत आहेत.
नोटाबंदीच्या विरोधात आपण पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर निदर्शने करू, असा इशारा देऊन त्या म्हणाल्या की, संपूर्ण देशाला या निर्णयाचा त्रास होत आहे. बॅँक, एटीएममध्ये पैसे नाहीत. आतापर्यंत ८० बळी यात गेले आहेत. मात्र, नरेंद्र मोदी शांतपणे झोपले आहेत. तसेच ते ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्थेवर व्याख्याने झोडत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
ग्रामीण भागात राहणा-या अनेकांची बॅँकेत खाती नाही. ते या परिस्थितीचा सामना कसा करणार. हा जनताविरोधी निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत आपण लढतच राहू. त्यांनी देशात अघोषित आर्थिक आणीबाणी लादली आहे. मी त्यांना या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी योजना सांगितली.
मात्र, ते ती मान्य करायला तयार नाहीत. ते विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तिकर खात्यांचा ससेमिरा मागे लावतील. मात्र ते माझा आवाज दाबू शकत नाही. मी पुन्हा दिल्लीत जाऊन आवाज उठवेन. मी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करेन, असा इशारा त्यांनी दिला.
अजून एक भ्रष्टाचारी !
तुझ्यासारखी मूर्ख मेलेलीच बरी