उत्तर प्रदेशचे मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अकरावीत शिकणा-या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली.
रामपूर(उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशचे मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अकरावीत शिकणा-या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान च्या कलम २२ अ अंतगर्त त्याला दोषी ठरवत स्थानिक न्यायालयाने त्याला तुरुंगात धाडले आहे. आझम खान यांचे प्रसिद्धी प्रमुख फसाहत अली खान यांनी या पोलीस ठाण्यात या प्रकऱणी तक्रार दाखल केली होती.
मंगळवारी आरोपी विद्यार्थ्याला न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी न्यायलयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
छान…
देशाविरुद्ध तो नालायक जी गरळ ओकत असतो त्याबद्दल त्याला कधी केली का अटक?