न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅकक्युलमने भारतीय क्रिकेटचाहत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी खास पत्रही लिहिले आहे.
मेलबर्न – मेलबर्नच्या मैदानावर रविवारी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियादरमान विश्वचषकातील अंतिम लढत रंगणार आहे. विश्वचषकात पहिल्यांदाच उपांत्यफेरीत पोहोचलेला न्यूझीलंड संघ जेतेपदाला गवसणी घालण्यास सज्ज झाला आहे. यासाठी संघाला मोठ्य़ा संख्येने पाठिंबा देण्याचे आवाहन किवी क्रिकेटपटूंनी केले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅकक्युलमने भारतीय क्रिकेटचाहत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी खास पत्रही लिहिले आहे. या पत्राद्वारे त्याने भारतीय चाहत्यांना सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे आणि भारतीय चाहते न्यूझीलंडला पाठिंबा देतील अशी आशाही त्याने व्यक्त केला.
‘मला विश्वास आहे की भारतीय चाहते किवी संघाला नक्कीच पाठिंबा देतील’, असे सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मॅकक्युलमने सांगितले.
भारत पाठिबा देणार असे मला वाटते . मी तर देणारच आहे माझा फुल पाठींबा आहे किवी ला…