आत्महत्या करण्यापेक्षा दोन-पाच पोलिसांना ठार मार या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल पटेल आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल विरोधात गुजरात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
सूरत – आत्महत्या करण्यापेक्षा दोन-पाच पोलिसांना ठार मार या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल पटेल आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल विरोधात गुजरात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
तीन ऑक्टोंबरला हार्दिकने हे चिथावणीखोरी विधान केले होते. भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १२४ (अ) अंतर्गत सूरतच्या आमरोली पोलिस स्थानकात हार्दिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत: पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
२२ वर्षीय हार्दिकने सूरतमध्ये तीन ऑक्टोंबरला पटेल समाजातील विपुल देसाई या युवकाला आत्महत्या करण्यापेक्षा दोन-पाच पोलिसांना ठार मार. पटेल कधीही आत्महत्या करत नाहीत असे वादग्रस्त विधान केले होते.
हार्दिक वृत्तवाहिन्यांच्या कॅमे-यासह विपुलच्या घरी गेला होता. विधान केल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी हार्दिक विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हार्दिकला रविवारी भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी राजकोटच्या स्टेडियमबाहेरुन ताब्यात घेण्यात आले होते. सामना उधळून लावण्यासाठी स्टेडियमच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.
पहिले ह्यालाच धडा शिकवा.