गावातील तलाठयाकडे आपणा सर्वाना कधी ना कधी जावे लागते. पण तलाठयाकडील नोंदवहीत स्थावर मालमत्तेसंबंधी अनेक माहिती उपलब्ध असते हे अनेकांना माहीतही नाही.
गावातील तलाठयाकडे आपणा सर्वाना कधी ना कधी जावे लागते. पण तलाठयाकडील नोंदवहीत स्थावर मालमत्तेसंबंधी अनेक माहिती उपलब्ध असते हे अनेकांना माहीतही नाही. भूमी अभिलेख गट नंबर, सव्र्हे नंबर, वन जमिनी, कूळ कायदा, गावाचे क्षेत्र, महसूल, जमिनींची चतु:सीमा आदी सर्व माहिती तलाठी कार्यालयाच्या नोंदवहीत असते. खाली तुम्हाला आम्ही नोंदवहीत काय काय असतं याची थोडीशी माहिती देत आहोत.
गाव नमुना नंबर १ : या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सव्र्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (अॅसेसमेंट) बाबतती माहिती असते.
गाव नमुना नंबर १ अ : या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते.
गाव नमुना नंबर १ ब : या नोंदवहीमध्ये सरकार मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १ क : या नोंदवहीमध्ये कूळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उता-यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे, असे ठरविता येते.
गाव नमुना नंबर १ ड : या नोंदवहीमध्ये कूळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सव्र्हे नंबर आणि गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १ इ : या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण आणि त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
गाव नमुना नंबर २ : या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती जमिनींची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ३ : या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.
गाव नमुना नंबर ४ : या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ५ : या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ६ : (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ६ अ : या नोंदवहीमध्ये फेरफार (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार आणि चौकशी अधिका-यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ६ क : या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ६ ड : या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ७ : (७/१२ उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सव्र्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ७ अ : या नोंदवहीमध्ये कूळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ८ अ : या नोंदवहीत जमिनीची नोंद, सव्र्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ८ ब, क व ड : या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ९ अ : या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १० : या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर ११ : या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सव्र्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १२ आणि १५ : या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १३ : या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १४ : या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठयाबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १६ : या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १७ : या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर १८ : या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
गाव नमुना नंबर १९ : या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर २० : पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर २१ : या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामांची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
नमस्कार,
गाव सिमांना रस्ते हे आधिकृत सोडलेले असतात की दोन्ही बाजूचे शेतकरी जागा देतात ? कृपया माहिती मिळावी.