केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नायजेरियन जनतेची माफी मागावी, नाहीतर आम्ही तक्रार करु, असा इशारा नायजेरियाने दिला आहे.
नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टिप्पणी करताना नायजेरियाचा उल्लेख केल्याने नायजेरिया दुतावासाने नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नायजेरियन जनतेची माफी मागावी, नाहीतर आम्ही तक्रार करु, असा इशारा उच्चायुक्त ओ. बी. ओकोंगोर यांनी दिला आहे.
गिरीराज सिंह यांनी सोनिया गांधींबाबत वर्णभेदावर आधारित वक्तव्य केल्यामुळे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या अश्लाघ्य भाषेचा वापर खपवून घेतला जाणार नाही, असे शाह यांनी सर्व भाजपा नेत्यांना बजावले आहे.
तसेच गिरीराज सिंह यांना अमित शाह यांनी चांगलेच फटकारले असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समजते. सोनिया गांधी या गो-या आहेत त्यामुळे त्यांचे नेतृत्व काँग्रेस यांनी स्वीकारले, जर त्या नायजेरियन असत्या तर त्यांना कुणी काँग्रेसचे अध्यक्ष बनवले असते का, असे गिरीराज सिंह म्हणाले होते. अशी भाषा यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे शाह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते यापेक्षाही कठोर भाषेत बोलतात. परंतु काँग्रेसच्या नेत्यांना कधी माफी मागावी लागत नाही. तेव्हा टिका करताना भान ठेऊन बोला, असेही अन्य भाजपा नेत्यांनीही गिरीराज यांना सुनावले.
किती हुशार माणसे मंत्री बनतात पहा ,एक चांगले उदाहरण . मेरा भारत महान !!