राज्यात मित्र पक्षांची जुळवाजुळव सुरू असताना भाजप पक्षांतर्गत मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र झाली आहे.
राज्यात मित्र पक्षांची जुळवाजुळव सुरू असताना भाजप पक्षांतर्गत मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र झाली आहे. मी दिल्लीत रमलो आहे, असे सांगणा-या नितीन गडकरी यांच्या समर्थक आमदारांनी मंगळवारी नागपुरात गडकरीवाडय़ावर शक्तिप्रदर्शन करीत गडकरी यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी केली.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी तशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे या सर्वाची नावे मागे पडून आता गडकरी यांचे नाव एकदम आघाडीवर आले आहे.
मी दिल्लीत खूश आहे, असे सांगणारे गडकरी कदाचित पक्षाने जबाबदारी टाकल्यामुळे राज्यात परतावे लागेल, असे सांगत मुख्यमंत्री पदी विराजमान होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गडकरी साहेब ! तुम्हीच मुख्यमंत्री व्हायलाच हवेत ,!