‘फ्रिडम २५१’ या स्वस्त स्मार्टफोन नंतर दुसरा स्वस्त स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे.
नवी दिल्ली-‘फ्रिडम २५१’ या स्वस्त स्मार्टफोन नंतर दुसरा स्वस्त स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. २५१ या स्मार्टफोननंतर आता ‘डोकॉस मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेड’ या कंपनीने ‘डोकॉस एक्स १’ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी ८८८ रुपये आहे.
या स्मार्टफोनची बुकिंग बुधवार, २७ एप्रिलपासून सकाळी सहा वाजता सुरू करण्यात येणार आहे. तर २९ एप्रिल रात्री १० वाजेनंतर बुकींग बंद करण्यात येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची डिलीवरी २ मे पासून सुरु होणार आहे.
या स्मार्टफोनची बुकिंग कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.docoss.com वर लॉगिन करुन केली जाते. किंवा एसएमएस करूनही हा स्मार्टफोन बूक केला जाऊ शकतो. त्यासाठी कंपनीने मोबाईल नंबर जाहीर केले आहेत.
तुमचे नाव, पत्ता आणि पिन कोड तुम्हाला ९६१६००३३२२ या नंबरवर पाठवायचा आहे. कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला ९९ रुपये डिलिव्हरी चार्ज अधिक द्यावे लागणार आहेत.
बुक mobile
English