आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.
नवी दिल्ली- आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. या मुलीने दिल्लीतील कमला मार्केट पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. जोधपूरमधील आसाराम बापूंच्या गुरूकुलमध्ये ही मुलगी शिक्षण घेत होती. या काळात आसाराम बापूंनी अनेकवेळा आश्रमात बोलवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापूंविरोधात राजस्थानातील जोधपूरमधील एका अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत आसाराम बापूंच्या आश्रमात त्यांच्यासह अनेकांनी लैंगिक शोषण केल्याचे या मुलीने आरोप केले आहेत. या मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही मुलगी सध्या आसाराम बापूंच्याच छिंदवाड़ा येथील गुरुकूलमध्ये बारावीत शिकत आहे. ही घटना जोधपूरची असल्याने दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जोधपूर पोलिसांकडे सोपवला आहे.
यापूर्वी आसाराम बापू विविध कारणांमुळे चर्चेत आले आहेत. दिल्लीत १६ डिसेंबरला झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत तरुणीने बलात्का-यांना ‘भाऊ’ म्हणायला हवे होते, असे बोलून खळबळ उडवून दिली होती. तर महाराष्ट्रात दशकभरातील सर्वात मोठा दुष्काळ असताना मार्च महिन्यात त्यांनी पाण्याची नासाडी करत रंगपंचमी साजरी केली. आश्रमात २००८ मध्ये दिपेश वाघेला (१०) आणि अभिषेक वाघेला (११) या दोन मुलांचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि साबरमती नदीकिनारी सापडलेले मृतदेह याप्रकरणी आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई चांगलेच चर्चेत आले होते.
दरम्यान, आसाराम बापूंच्या प्रवक्त्याने हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
ye sab khrischhan logo ki chal hai, humare hindu log unki batome aakar apna dimag lagana bhul gaye hai!!!!. jo gandhe movies nikalte hai unke khilaff koi aawaz nahi uthata, kisi news channel walo me dum hai to wo bapujika satsang aur unke satkarya dikhaye, lekin TRP ( tedhi rahoo ka paisa) ki aadat hai na, to ye log kyun dikhayenge? Aajki Yuwa pidhi ko to philmo ki gandgi (excreta) etna pasand hai wo kya jane sant hume kya dena chahte hai?