बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचा मंगळवारी हैदराबादच्या ताज फलकनुमा हॉटेलमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला.
हैदराबाद – बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचा मंगळवारी हैदराबादच्या ताज फलकनुमा हॉटेलमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. दिल्ली स्थित उद्योगपती आयुष शर्माबरोबर अर्पिता विवाहबध्द झाली.
संध्याकाळी साडेचार वाजता वरातीने सुरु झालेला हा विवाह सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा, भाऊ अरबाज, सोहेल आणि अन्य कुटुंबियांनी वरातीचे जोरदार स्वागत केले.
पंजाब हिंदू परंपेरच्या विधीनुसार हा विवाह झाला. या विवाहसोहळयामध्ये सलमान, आई हेलन, वहिनी मलायका यांनी हिंदी चित्रपटातील काही खास गाण्यांवर आपले परफॉर्मन्स दिले. पंजाबी गायक मिका आणि यो यो हनी सिंग यांनीही या विवाहसोहळयामध्ये आपल्या गाण्यांनी रंग भरले.
बॉलिवूड, उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिगज्जांना या विवाहसोळयाचे निमंत्रण होते. एकूण २५० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. आमिर खान, कटरीना कैफ आणि करण जोहर हे बॉलिवूडचे टॉप स्टार या विवाह सोहळयाला उपस्थित होते.
ताज फलकनुमा हॉटेलभोवती मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त तैनात होता तसेच प्रसारमाध्यमांना तेथे प्रवेश नव्हता त्यामुळे बॉलिवुडचे आणखी कोणते कलाकार या विवाहसोहळयाला उपस्थित होते ते समजू शकले नाही.
अर्पिता आणि आयुषला दिलेल्या आर्शिवाद-सदिच्छांबद्दल सलमानने टि्वटरवरुन आपल्या चाहत्यांचे आभार मानले असून, त्याने लवकरच विवाहाचे फोटो टि्वटरवर अपलोड करु असे सांगितले आहे.
aayushy maan bhav!