आपला मार्केटिंगचा व्यवसाय करत असताना नेहमीच्या वापरात असलेल्या साहित्यातून त्यांनी भातझोडपणी व मळणीयंत्र आणि भात वाळवण्याचे यंत्र तयार केले आहे.
दैनंदिन जीवनात होणारे काम कमी कष्टदायक कसे होईल, यासाठी विविध शाखांमधील अभियंते सतत कार्यरत असतात. यासाठी त्यांना सर्वसामान्यांशी सुसंवाद ठेवावा लागतो. पण अभियंत्यांमधील गुण सर्वसामान्यांनीच घेतल्यास किती सहज-सोप्या पद्धतीने यंत्रनिर्मिती व त्याच्या विविध कल्पना आकार घेऊ शकतात, याचे उत्तम उदाहरणे अणाव घाटचेपेडवाडी येथील दिलीप भगवान पालव यांच्या घरी पाहायला मिळते. आपला मार्केटिंगचा व्यवसाय करत असताना नेहमीच्या वापरात असलेल्या साहित्यातून त्यांनी भातझोडपणी व मळणीयंत्र आणि भात वाळवण्याचे यंत्र तयार केले आहे.
गेली कित्येक वष्रे मार्केटिंग व्यवसायातच कार्यरत असताना एखाद्या गोष्टीमागे नेमके कोणते तंत्र वापरले गेले आहे, हे शोधण्याची दिलीप पालव यांना जणू सवयच लागून गेली आहे. विविध गावांमध्ये व्यवसायासाठी जात असताना एकदा त्यांनी एका व्यक्तीकडे इलेक्ट्रिक व पावरट्रिलरवर चालणारे भातझोडणी मळणीयंत्र बघितले. हजारो रुपये किंमत असलेले हे यंत्र थोडय़ाबहुत प्रयत्नांनंतर बनवणे शक्य आहे. असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी हे यंत्र बनवण्याचा चंगच बांधला. अनेक प्रयत्नांनंतर त्यांचे यंत्र आकार घेऊ लागले. या भातकापणीवेळी त्यांनी यंत्र आजमावूनही पाहिले. पण यंत्राचा वेग झोडणीवेळी भाताचे दाणे तुटायचे किंवा तांदूळच बाहेर यायचा तर वेग कमी झाला तर दाणे गवताला चिकटून बसायचे. मात्र, या समस्येने माघार न घेता त्यांनी ही समस्याही दूर केली. या वर्षी यंत्राचा उत्तम वापर झाला. शिवाय मनुष्यबळही कमी लागले. पूर्वी झोडपणीनंतर दाणे बाजूला करणे, उरलेले गवत रचून ठेवणे व काही काळाने त्याची मळणी करणे असे काम करावे लागत होते. मात्र, आता यंत्राच्या माध्यमातून ही सर्व कामे एकाच वेळी होत आहेत. चर्चेतून त्यांच्या यंत्राची ख्याती जवळच्या गावातही पोहोचली. इलेक्ट्रिक मोटार रबराचे पट्ट, बेअरिंग आणि इतर लाकूड सामान यांच्या माध्यमातून पालव यांनी बनवलेले हे यंत्र पाहण्यासाठी गावातील ब-याच शेतक-यांनी गर्दी केली होती. केवळ निरीक्षणातून आपल्या घरातच तयार केलेल्या यंत्रामुळे त्यांनी आपले काम सोपे केलेच, शिवाय या व्यवसायातून आर्थिक उन्नतीही साधली. भात वाळवणी यंत्रही त्यांनी बनवले आहे. अलीकडे सर्रास भात वाळवण्यासाठी नैसर्गिक वा-यावर अवलंबून न राहता शेतकरी टेबल फॅनचाच वापर करतो, यातही जमिनीवर ठेवलेल्या गोणत्यातून भात सुपात घेणे आणि पंख्याच्या पुढील बाजूस उभे राहत दोन्ही हात वर करून सुपातील थोडे थोडे भात खाली ओतले जाते. या वेळी भात वाळवणा-याचे हात दुखतात. शिवाय कमरेचाही त्रास जाणवू लागतो. हा त्रास कसा कमी करता येईल, यावर विचार करत असताना दिलीप पालव यांना एक अनोखी कल्पना सुचली. त्यांनी जवळपास पाच फूट उंचीचे लाकडी स्टँड तयार केले. गिरणीत भात ओतण्यासाठी ज्या प्रकारे शंकू आकाराचे भांडे केलेले असते, त्यासारखे लाकडी फळीचे भांडे तयार केले. मात्र, या भांडय़ाला एकच होल न करता त्यांनी एक फूट लांबीची खाच तयार केली. या खाचीचा आकार लहान-मोठा करण्यासाठी एक झडपही बसवली. भाताला वारा देताना वरच्या शंकू आकाराच्या भांडय़ात भात ओतायचे आणि आपल्या आवश्यकतेनुसार खाचेतील जागा निश्चित करायची, मग पंख्याचा वारा आपले काम चोख बजावतो. लाकडी भांडय़ाच्या खाचीतून भात एका लयीतून आणि लांब पट्टय़ात खाली पडते. यामुळे जड रूप वर उचलून भात ओतण्याचे कष्ट पडत नाहीत आणि एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर भात भांडय़ात टाकता येत असल्याने वेळेचीही बचत होते. नुसत्या फॅनवर भात वाळवण्यापेक्षा या कल्पनेतून साकारलेल्या या यंत्रामुळे ही वेळ जवळपास तिप्पट ते चौपटीने कमी होते. आपल्यातील उपजत कला त्यास मिळवलेल्या ज्ञानाची जोड यातून दिलीप पालव यांनी शेतक-यांसाठी उपयुक्त तंत्र तयार करून आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे. या प्रयत्नात त्यांना त्यांची पत्नी दर्शना पालव व घरातल्या मंडळींच्या सहकार्याबरोबरच शशिकांत अणावकर यांचेही सहकार्य लाभले आहे.
सर , मला दिलीप पालव एनचा नंबर मिलेका
किवा त्यंच्या गावचा पत्ता मिल का कुर्पया
मला मेल वर किवा माझा मो. नो. काळवावे
संतोष मोरे ९५२७७३७९४३ /९८८१९७०६७२
पुणे
मला भात मळणी साठी मशिन हवी आहे माझ्याकडे पावर टेलर आहे मी हे तुमच्या पावर टेलरच्या सह्याने मळणाी कशी करतात ते मी खालील चित्रामध्ये बघितले आहे माझा नं ९४२२९८६७७२ ज्ञानेश्वर रेणुसे. पुणे
ला भात मळणी साठी मशिन हवी आहे माझा नं 9869448604
या तंत्रज्ञानासाठी एकंदरीत काय खर्च येईल, ते कृपा करून मला माझ्या मोबाईलवर कळवा… लक्ष्मन 7506334937
cantact :- रमेश मेस्त्री, झाराप.
मोबा. 7506313431
२००७ पासून मळणीयंत्र बनवतात.
This model is copied from them
योग्य व orignally advanced मोडेल साठी, call करा 7506313431
this was copied