देशा-विदेशातील शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘भारत श्री’,‘आशिया श्री’ असे मानाचे किताब एकामागोमाग एक पटकावून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेला आणि पनवेलच्या नायब तहसीलदार असलेल्या सुहास खामकर यांनी नवा पराक्रम केला आहे.
पनवेल– देशा-विदेशातील शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘भारत श्री’,‘आशिया श्री’ असे मानाचे किताब एकामागोमाग एक पटकावून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेला आणि पनवेलच्या नायब तहसीलदार असलेल्या सुहास खामकर यांनी नवा पराक्रम केला आहे. एका सातबा-यावर नाव चढवण्यासाठी खामकर यांनी ५० हजारांची लाच मागितली. ती घेताना रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्यांना सोमवारी रंगेहाथ अटक केली.
एका सातबा-यावर नाव चढवण्यासाठी खामकर याने ५० हजारांची लाच मागितली होती. ती घेण्यासाठी त्याने त्याचा सहकारी गणेश भोगाडे याला पाठवले होते. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी भोगाडे याला ताब्यात घेतल्यावर हे प्रकरण उघड झाले.
या प्रकरणातील तक्रारदार पनवेलमधील कोयनावेंळे येथील जमीन मालकाकडे नोकरीला आहे. त्याच्या मालकाने पेंधर आणि कोयनावेंळेतील जमीन खारघरमधील शरद सावंत यांना ७ सप्टेंबर २०१३ रोजी विकली होती. या जमिनीच्या सातबा-यावर जमीन विकत घेणा-या मालकाची नोंद होण्यासाठी कदम यांनी पेंधरच्या तलाठयांकडे गेल्या वर्षी अर्ज केला होता. हे प्रकरण पेंधरच्या तलाठयांनी पनवेलच्या तहसीलदार कार्यालयात पाठवले होते. त्यामुळे तक्रारदार त्याच्या मालकासह तहसीलदार कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार सुहास खामकर यांना भेटले. ज्यांना जमीन विकली त्यांच्या नावाची नोंद करण्याची विनंती केली. त्या वेळी खामकर यांनी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करून काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.
३० जुलै २०१४ रोजी तक्रारदाराच्या मालकाने पनवेल तहसील कार्यालयात तक्रारदाराला पाठवून नावाची नोंद झाली आहे की नाही, हे तपासण्यास सांगितले. त्या वेळी खामकर याने त्याचा सहकारी गणेश भोगाडे याला भेटावयास सांगितल्यानंतर त्याने लाचेची मागणी केली होती. खामकर याने सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावण्याचा पराक्रम केला.
सरकारने त्याला शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले आहे. क्रीडा क्षेत्रातील त्याच्या योगदानामुळे त्याची नायब तहसीलदार पदावर नियुक्ती झाली होती. तो कारकिर्दीच्या शिखरावर असताना लाचखोरीच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कलगुटकर, महिला पोलिस निरीक्षक इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एक भले “मानुसको ” पैसे कि लालच ने अमानुष बना दिया !!!!!!!!
डिअर,सुहास खामकर साहेब ,तुमच्यावर रिश्वत खोरीचे आरोप करणाऱ्यांची मानगूट का धरीत नाहीत ????