मुंबई शहर सत्र आणि दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. टी. गायकवाड यांना महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निलंबित केले आहे.
मुंबई- मुंबई शहर सत्र आणि दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. टी. गायकवाड यांना महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निलंबित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल शालिनी फनसळकर- जोशी यांनी या वृत्तला दुजोरा दिला आहे.
या महिलेने न्यायालयातच लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी न्यायाधीश एस. डी. तुलनकर यांच्यामार्फत करण्यात आली. यात गायकवाड यांनी संबंधित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच महिलेने केलेल्या आरोपात प्रथमदर्शिनी तथ्य असल्याचे आढळल्याने गायकवाड यांना निलंबित केले आहे.
गायकवाड मुंबईतील शहर सत्र आणि दिवाणी न्यायालयातील विशेष नार्कोटीक विभागाच्या न्यायालयात न्यायाधीश आहेत. न्यायालयात काम करणा-या कनिष्ठ कर्मचारी महिलेने गायकवाड यांनी कार्यालयातच गैरवर्तन करुन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गायकवाड यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गायकवाड यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश तुलनकर यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत कार्यालयातील अन्य काही महिलांनीही गायकवाड हे कार्यालयातील महिला कर्मचा-यांसोबत अनुचित गैरवर्तन करत असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिशांमार्फत नियुक्त करण्यात येणा-या वरिष्ठ न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली गायकवाड यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.
बरोबर ठोका साल्याला ! चामडीचा आशिक फ्होद्या साला !!!!