यंदाचा मामि चित्रपट महोत्सव १७ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत होणार आहे. जगभरात गाजलेले दोनशे चित्रपट पाहण्याची संधी यानिमित्ताने मुंबईकरांना मिळणार आहे. १४ वर्षाच्या वाटचालीत मुंबईच्या प्रतिष्ठेत मानाचा तुरा खोवणा-या ‘मामि चित्रपट महोत्सवा’चा हा कर्टनरेझर
जगभरातल्या चित्रपटप्रेमींमध्ये चित्रपट महोत्सवांविषयी मोठी चर्चा असते. वारकरी ज्या आत्मीयतेने पंढरीला जातात त्याच आत्मीयतेने जगभरातल्या महोत्सवांना जाणा-या रसिकांची संख्याही काही कमी नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने देश-विदेशातले उत्तमोत्तम व नावाजलेले चित्रपट एकत्र पाहण्याची संधी मिळत असते. जगात ‘कान’, ‘बर्लिन’, ‘मेलबर्न’, ‘बुसान’ असे अनेक महोत्सव प्रतिष्ठेचे समजले जातात. भारतातही गोव्यात दरवर्षी भरणारा ‘इफ्फी’, तसंच इतर अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपट भरवले जातात. मात्र भारतीय चित्रपटउद्योगाची मुहूर्तमेढ जिथे रोवली गेली, त्या मुंबापुरीत मात्र अनेक र्वष चित्रपट महोत्सव भरवला जात नव्हता. ही बाब मुंबईतल्या काही आंतरराष्ट्रीय चित्रपटप्रेमींना खटकत होती. त्यातून मग त्यांनी ‘मुंबई असोसिएशन ऑफ मूव्हिंग इमेजेस’ या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेच्या माध्यमातून पुढे मुंबईत चित्रपट महोत्सव सुरू झाला. ‘मामि महोत्सव या नावाने प्रसिद्ध झालेल्या या महोत्सवाचं यंदा पंधरावं वर्ष आहे.
यंदाच्या मामि महोत्सवात रसिकांना चांगले चित्रपट पाहायला मिळावेत, त्याचबरोबर चित्रकर्मीना व या विषयाच्या विद्यार्थ्यांनाही चांगलं मार्गदर्शन मिळावं यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तरुण चित्रकर्मीना प्रोत्साहन देण्यासाठी ‘डायमेन्शन्स मुंबई’ या लघुपटाच्या स्पर्धेबरोबरच इतरही अनेक श्रेणींमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यातल्या यशस्वी चित्रपटांना भरघोस पारितोषिकंही देण्यात येतील. एकंदरीतच सात दिवस चालणा-या या महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट कलेचा जागरच भरवला जाणार आहे.
यंदाच्या मामि महोत्सवात एकूण २०० चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार असून यात अफगाणिस्तान व स्पॅनिश चित्रपटांचं खास दालन असेल. यातल्या काही चित्रपटांचा घेतलेला हा वेध
‘द बटलर’ ने शुभारंभ
हा चित्रपट १६ ऑगस्ट २०१३ रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला. परीक्षकांनी गौरवलेल्या या चित्रपटाने आपल्या बजेटच्या तुलनेत अफाट कमाई केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचं निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसमधल्या एका कर्मचा-याच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. पण हा या चित्रपटाचा एकमेव पदर नाही, तर त्याच्या अनुषंगाने बदललेला काळ, लोकांची बदललेली मानसिकता हेही दिसून येतं. ली डेनियल यांच्या या चित्रपटाची भारतीय सिनेरसिकांना प्रतीक्षा होती. याच चित्रपटानेच यंदाच्या ‘मामि महोत्सवा’चा आरंभ होत आहे.
‘द फिफ्थ इस्टेट’ने सांगता
‘द फिफ्थ इस्टेट’ हा सध्याच्या सत्ताकेंद्रित राजकारणावर आधारित चित्रपट आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणा-या लोकांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करणा-या एका गटावर हा चित्रपट आधारित आहे. सस्पेन्स थ्रिलर या प्रकारातला हा चित्रपट माहिती, संगणकीय नोंदी व त्याचा वापर-गैरवापर या विषयावर अत्यंत गंभीर व प्रभावी भाष्य करणारा आहे. या वर्षी अनेक महोत्सवांमध्ये गाजलेला हा चित्रपट पाहण्याची संधी यानिमित्ताने भारतीय रसिकांना मिळणार आहे. यंदाच्या मामि चित्रपट महोत्सवाचा आरंभ व शेवट हा अमेरिकन चित्रपटाने होत आहे, हे विशेषच.
भारतीय सिनेमा
गीतू मोहनदास यांचा ‘लायर्स डायस’, ‘क्रॉसिंग ब्रिजेस’, ‘द वर्ल्ड ऑफ गोपी अँड बाघा’, ‘व्हर्जिन टॉकीज’, ‘अ सायलंट वे’, ‘मौनराग’ (मराठी), ‘इनव्हीनसिबल’, ‘पॉवरलेस’, ‘द टेल ऑफ लोनली घोस्ट’, ‘ऊंगा’, ‘सनग्लास’, ‘मस्तराम’, ‘बकरापूर’, ‘वाइल्ड बेरिज’, ‘सुलेमानी किडा’, ‘मुन्सीफ’
इथे पाहा ‘मामि’
मामि चित्रपट महोत्सवातील चित्रपट आपण लिबर्टी, मेट्रो व सिनेमॅक्स (वसरेवा) या ठिकाणी पाहू शकणार आहोत. त्यापैकी मेट्रो हे प्रमुख केंद्र असेल.
स्पॅनिश सिनेमे
सन ऑफ केन
पिकासोज गँग
कॉम्बुशन
द लिबरेटर
विरीडायना
इल वर्डुगो
द हन्ट
सेव्हन डेज इन जानेवारी
लव्हर्स ऑफ द आर्टिक्ट सर्कल
वोल्व्हर अ एम्परर
वेलकम मिस्टर मार्शल
बार्बडो द सेव्हिलिया
अॅन् अंडाल्युशियन डॉग
कार्मेन
कंबोडियन सिनेमे
भारतीय प्रेक्षकांना अमेरिका, फ्रान्स, इराण, इराक, चीन, कोरिया यांसारख्या देशातल्या चित्रपटांविषयी माहिती असते. मात्र कंबोडियासारख्या देशांतल्या चित्रपटांविषयी अनेक जण अनभिज्ञ असतात. त्यांच्यासाठी यंदा कंबोडियन सिनेमांचे एक खास दालन ठेवणार आलं असून यात एकूण सहा चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
गोल्डन स्लमबर
अ रिव्हर चेजेंस कोर्स
द मिसिंग पिक्चर्स
रेड वेडिंग
व्हेअर आय गो
टू गर्ल अगेन्स्ट द रेन
कोस्टा ग्रॅव्हेरा यांचे चित्रपट
‘झेड’, ‘स्टेट ऑफ सिज’, ‘आमेन’, ‘द अॅक्स’, ‘इडन इज वेस्ट’, ‘कॅपिटल’
अभिजाताचं जतन
चार्ली चॅप्लिन यांचा ‘द फ्लोअरवॉकर’
आल्फ्रेड हिचकॉक यांचा ‘ब्लॅकमेल’
मार्टिन स्कोअसे यांचा ‘द किंग ऑफ कॉमेडी’,
बेहराम बैजल यांचा ‘डाउनपोअर’
ओशिझिरू ओझू यांचा ‘टोक्यो स्टोरी’
हशीओ हेलेन होऊ यांचा ‘टाइम टू लिव्ह अॅण्ड टाइम टू डाय’
जोसेफ मॅनक्लेव्हाइस यांचा ‘ऑल अबाउट इव्ह’
ठळक वैशिष्टये
एकूण २०० चित्रपटांची मेजवानी
पारितोषिकांची रक्कम २,२०,००० डॉलर्स
ब्रॉस बेअरफोर्ड, असगर फरहादी, लिओस कॅरेक्स, सादिक बरमार्क, नटाले बोये, मसाटो हराडा अशा मान्यवरांची उपस्थिती
यशराज चोप्रा, रितुपर्णा घोष व प्राण यांना आदरांजली
स्पॅनिश, कंबोडियन, अफगाणी सिनेमांचं विशेष दालन
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मास्टरक्लासेस
अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्सचं विशेष मार्गदर्शन
Greetings from Ohio! I’m bored at work so I decided
to browse your site on my iphone during lunch break.
I really like the info you provide here and can’t wait to take a look when
I get home. I’m amazed at how quick your blog loaded on
my cell phone .. I’m not even using WIFI,
just 3G .. Anyhow, good site!
Excellent post. I was checking constantly this blog and I am impressed!
Extremely useful information specially the last part 🙂 I
care for such info a lot. I was seeking this particular information for a long time.
Thank you and good luck.