पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंग यांच्या मृत्यूने बीएसएफने संताप व्यक्त केला आहे.
जम्मू- पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंग यांच्या मृत्यूने बीएसएफने संताप व्यक्त केला आहे. आमच्या सैनिकांना पुन्हा हात लावल्यास त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा सीमा सुरक्षा दलाने दिला.
पाकिस्तानी रेंजर्सनी शुक्रवारी सकाळी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंग हे जबर जखमी झाले. गुरुनाम सिंग यांच्या डोक्याला गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र शनिवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शहीद गुरुनाम सिंग यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, आम्ही कोणत्याही कारवाईसाठी सज्ज आहोत.
आमच्या कोणत्याही जवानाला हात लावल्यास त्याची जबर किंमत मोजायला लावू, असा इशारा त्यांनी दिला. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत, या वृत्ताबाबत ते म्हणाले की, सीमा सुरक्षा दलाकडे पूर्ण माहिती असून कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
१९-२० ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्तानातून होणारी घुसखोरी गुरुनाम सिंग आणि त्यांच्या सहका-यांनी उधळून लावली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात गुरुनाम सिंग हे गंभीर जखमी झाले. त्यांना दिल्लीत उपचारासाठी नेले जाणार होते, मात्र शनिवारी मध्यरात्रीच त्यांचा मृत्यू झाला.
manohar parrikar saheb aata vaat कोणाची pahat baslai tumhi? Haatat baangdya भरा !