सतत्याच्या परदेश दौ-यांमुळे विरोधी पक्षांच्या टिकेचे लक्ष्य ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुन्हा एकदा परदेश दौ-यावर जाणार आहेत.
नवी दिल्ली – सतत्याच्या परदेश दौ-यांमुळे विरोधी पक्षांच्या टिकेचे लक्ष्य ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुन्हा एकदा परदेश दौ-यावर जाणार आहेत. नुकतेच ते तीन देशांचा सहा दिवसीय दौरा आटोपून परतले.
पुढच्याच जून महिन्यात मोदी बांगलादेश आणि त्यानंतर जुलैमध्ये रशिया आणि पाच मध्य आशियाई देशांच्या दौ-यावर जाणार असल्याची चर्चा आहे. सध्या मोदींच्या या आगामी दौ-याच्या नियोजनाचे काम चालू आहे.
शेजारी देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंधांचे मोदींचे जे धोरण आहे त्याचाच भाग म्हणून मोदी बांगलादेश दौ-यावर जाणार आहेत. जुलैमध्ये मोदी रशिया तसेच कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांचा दौरा करणार आहेत.
रशियन शहर उफामध्ये ९ आणि १० जुलैला ब्रिक्स परिषद होणार आहे. त्यादरम्यान मोदी सहा देशांचा दौरा करतील. भूतान, नेपाळ, श्रीलंकेनंतर मोदी बांगलादेश दौ-यावर जात आहेत. ८ ते १० जून दरम्यान मोदी बांगलादेशचा दौरा करण्याची शक्यता असून, यावेळी दोन्ही देशांच्या सीमा करारावर स्वाक्ष-या होण्याची शक्यता आहे.
हा भारतात येतो तरी कशाला