रेल्वे भाडे, साखर, पेट्रोल व डिझेल दरवाढीपाठोपाठ आता विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १६ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे.
नवी दिल्ली- रेल्वे भाडे, साखर, पेट्रोल व डिझेल दरवाढीपाठोपाठ आता विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर वाढवून केंद्र सरकारने आम आदमीला आणखी एक धक्का दिला आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १६ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने पेट्रोल दरात लिटरमागे १.६९ रुपये तर डिझेलच्या दरात ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयाला २४ तास होण्यापूर्वीच केंद्र सरकारने आता विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.
आता विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी दिल्लीत ९०६ रुपयांऐवजी ९२२.५० रुपये द्यावे लागतील.
[EPSB]
महागाईचा आगडोंब
सार्वजनिक तेल पुरवठा करणा-या कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटलमागे एक रुपया ६९ पैसे तर डिझेलच्या दरात ५० पैसे वाढ करण्यात आली आहे.
[/EPSB]
हि सगळी भाववाढ १० वर्षे होतातच होती. नवीन ते काय?