अफगाणिस्तानात तालिबान विरुध्द लढताना आतापर्यंत अमेरिकेच्या २१८४ जवानांनी प्राण गमावले असून, १९,६०० जवान जखमी झाले आहेत.
वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात तालिबान विरुध्द लढताना आतापर्यंत अमेरिकेच्या दोन हजार १८४ जवानांनी प्राण गमावले आहेत. तर १९ हजार ६०० जवान जखमी झाले आहेत. अमेरिका गेल्या तेरावर्षांपासून अफगाणिस्तानात युध्द लढत आहे.
अल कायदाने २००१ मध्ये दहशतवादी हल्ल्यात न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे टॉवर पाडल्यानंतर अमेरिकेने अल कायदा आणि तालिबानला संपवण्यासाठी अफगाणिस्तानात युध्द सुरु केले.
आतापर्यंत आठ लाख ३१ हजार ५७६ जवानांची अफगाणिस्तानात तैनाती झाली आहे. सध्या ३२,८०० अमेरिकन लष्कराचे जवान अफगाणिस्तानात तैनात आहेत. पुढच्या काही महिन्यात अमेरिका आपले पूर्ण सैन्य अफगाणिस्तानातून माघारी बोलवून घेणार आहे.
तेरा वर्षांच्या युध्दानंतरही अमेरिकेला अफगाणिस्तानातून तालिबानला पूर्णपणे संपवणे शक्य झालेले नाही. या युध्दात अमेरिकेला ५३७.८ अब्ज डॉलरचा खर्च झाला आहे.
गोर्या अतांक्वद्याने संदाव्लेल्या निष्पाप मुसलमानाचा रक्ताचा हिशोब कोण करणार ?