भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्विस बँकांमधील खात्यांचे तपशील आता उपलब्ध होणार आहेत.
जिनिव्हा/नवी दिल्ली- भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्विस बँकांमधील खात्यांचे तपशील आता उपलब्ध होणार आहेत. या बँकांमधील खात्यांची माहिती आणि अन्य तपशील भारतासह अन्य देशांना देण्याची तयारी तेथील सरकारने दाखवली आहे. या माहितीच्या सहाय्याने भारतासह अन्य देशांना संबंधीत खातेदाराच्या काळ्या पैशाबाबत माहिती मिळून त्यावर खटला चालवणे शक्य होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतासह जगभरातील अन्य काही देशांनी स्विस बँकांमधील खात्यांचा तपशील देण्याची मागणी लावून धरली होती. स्वित्झर्लंड अर्थविषयक, तसेच बँक खात्यांतील माहिती गुप्त ठेवली जाते. मात्र आता ही माहिती देण्यास सरकारने तयारी दाखवली आहे. यासंदर्भात ज्या देशांसोबत करार करण्यात आले आहेत. त्यांना स्विस बँकांमधील माहिती देणार असल्याचे स्विस फेडरल काऊन्सिलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
स्वित्झर्लंडने जगभरातील ५८ देशांसोबत ‘ओईसीडी करार’ केला आहे. या करार केलेल्या देशांनाच बँक खात्यांमधील माहिती, देवाण-घेवाण तपशील आदी माहिती दिली जाणार आहे.
काळा पैसा, किंवा भ्रष्ट्राचाराने मिळवलेला पैसा स्विस बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवला जात असे. तसेच या बँकांमधील खात्यांचा तपशील मिळत नसल्यामुळे संबंधीत व्यक्तींवर कारवाई करण्यास जगभरातील अनेक देशांना शक्य होत नसे.
hahahaha…… are jayni tewle hote tayni agodarch paise transfar kele astil dusray thikani…..karan anna hajareni je andolan kelele tay nantar jayche hote tayni kadun getle asnar liwa account close keli asnar…