गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे या भागातील गरीब मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण ते राहत असलेल्या परिसराजवळ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने देवनार येथील ‘कुमुद विद्यामंदिर’ या शाळेची स्थापना करण्यात आली.
अभ्यासाबरोबर खेळातही अव्वल!
गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे या भागातील गरीब मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण ते राहत असलेल्या परिसराजवळ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने देवनार येथील ‘कुमुद विद्यामंदिर’ या शाळेची स्थापना करण्यात आली. शाळेचे संस्थापक आणि माजी मुख्याध्यापक शरद पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही शाळा उभी राहिली आहे.
‘कुमुद मेमोरिअल फं ड या संस्थेने जून १९६८ मध्ये ही शाळा सुरू केली. शैक्षणिक धोरणांचा योग्य अवलंब तसेच सुनियोजित अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षकवृंद यामुळे अभ्यासातील उच्च दर्जा राखण्यात शाळा यशस्वी झाली आहे. शाळेतल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची माहिती शाळा पालकांना वेळोवेळी करून देते. त्यामुळे शाळा आणि पालकांमध्ये विश्वासाचं नातं तयार झालं आहे. शिस्त, नियोजन आणि आनंददायी शिक्षण यामुळे शाळेने आजूबाजूच्या परिसरात नाव कमावलं आहे. अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही कुमुद विद्यामंदिरमधील विद्यार्थी भरीव कामगिरी करत आहेत. मीना पाटील यांचं देखील ही शाळा उभी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे.
ज्या मुलांना कुठेही प्रवेश मिळत नव्हता अशा मागास विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, या हेतूने मी या शाळेची स्थापना केली.मुलांचे ज्ञान वाढवण्यासोबतच जगातील वाढत्या स्पर्धेचा सक्षमपणे सामना करता यावा, यासाठी त्यांची तयारी करून घेणं, हेचं शाळेचं उद्दिष्ट राहिलं आहे. – शरद पाटील, संस्थापक
विद्यार्थ्यांमधील सर्वागीण कलागुणांना शाळेत वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना सुशिक्षित, सुजाण नागरिक बनवून त्याद्वारे राष्ट्रहिताला हातभार लावण्याचा शाळातर्फे प्रयत्न केला जातो. – चंद्रशेखर गर्गे, मुख्याध्यापक
i am also a student of this school up to class 7