दारूच्या नशेत २२ वर्षीय तरुणाने मित्राच्याच सहा वर्षाच्या मुलीवर राहत्या घरी बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
मुंबई- दारूच्या नशेत २२ वर्षीय तरुणाने मित्राच्याच सहा वर्षाच्या मुलीवर राहत्या घरी बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपी लक्ष्मण गुप्ता याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असताने सोमवापर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पीडित मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोरेगावच्या संतोषनगर परिसरात पीडित मुलगी तिच्या कुंटुबीयांसोबत राहते. तिचे वडील एका किरणा दुकानामध्ये कामाला आहेत. आरोपीही याच परिसरात राहणारा आहे. तोही शेजारील किराणा दुकानामध्ये कामाला आहे. आरोपी आणि मुलीचे वडील एकाच जिलतील असल्यामुळे एकमेकांना ओळखत होते. लक्ष्मण याला दारूचे व्यसन आहे. मंगळवारी सकाळी लक्ष्मणचे या मुलीच्या वडिलांशी पैशावरून भांडण झाले होते.
यात लक्षण याला मारहाण झाल्याने त्याचा राग मनात धरत लक्ष्मणने स्वत:च्या घरात कोणी नसल्याचे हेरून तिच्यावर अत्याचार केला आणि तिला घरी सोडून पळ काढला. मुलीची प्रकृती बिघाडल्याने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिच्या सुधारणा न झाल्याने के.ई.एम. रुग्णालयात हलवण्यात आले. तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
यानंतर मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेल्या प्रसंग सांगितला. या प्रकरणी लक्ष्मणविरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी लक्ष्मणला अटक केली असून त्याला न्यायालयाने १० नोव्हेंबपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे दिंडोशीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले.
पोलीस चवकशी ! पोलीस कोठडी ! कसली देता ? त्या भडवयाला सरळ गोळ्या घाला , भारत म्हणे मंगल ग्रहावर पोहचला ! उपटायला ???? रोज बलात्कार ! रोज खून ! रोज डाक्ये / दरोडे , ह्या भारतात , तरी ” मेरा भारत महान “