माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांचा अटकपूर्व जामिन अर्ज सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
चेन्नई – माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांचा अटकपूर्व जामिन अर्ज सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
जामिन अर्ज फेटाळून लावताना न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन यांनी मारन यांना केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग म्हणजेच सीबीआयला शरण जाण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे.
दयानिधी मारन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन, चेन्नईतील आपल्या निवासस्थानी ३२३ फोन जोडण्याचा घेतल्याचा सीबीआयने त्यांच्यावर आरोप ठेवला आहे. त्यांनी बीएसएनएलच्या अधिका-यांना तसे निर्देश दिले होते. त्यामुळे बीएसएनएलचे १,२०,८७, ७६९ रुपयांचे नुकसान झाले.
कोणत्याही प्रकारचा गुन्हा माफ होणे नाही तरच देश बलवान होईल.