‘तूर खरेदी करूनही रडतात साले’ असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
पुणे -महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची पाठराखण केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे पाटील म्हणाले. रावसाहेब दानवे यांना शेतक-यांच्या प्रश्नाची जाण आहे. ते कधी शेतकरीविरोधी बोलू शकत नाहीत. राजीनामा मागणे हे विरोधकांचे कामच आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘तूर खरेदी करूनही रडतात साले’ असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. जालन्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले होते. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी राळ उठवली.
राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी आंदोलन करत दानवेंविरोधात निदर्शनेही केली. यामुळे दानवेंच्या प्रकरणावर आता सरकारकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न होत आहे.
हि सर्वसाधारण भाषा गावाकडे ” साले ” वापरली जाते , परुंतु विरोधक काही तरी हाताला लागलाय त्याचा विपर्यास करत्यात.
.