अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवडय़ात बॉक्स ऑफिसवर १०० करोड रुपयांची कमाई केली आहे.
मुंबई- अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवडय़ात बॉक्स ऑफिसवर १०० करोड रुपयांची कमाई केली आहे. टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा रुस्तम हा २०१६ मधील तिसरा चित्रपट आहे आणि सर्वच चित्रपटाने तिकीटबारीवर १०० करोडचा गल्ला जमवला आहे. एअर लिफ्ट या सत्यकथेवर आधारित सिनेमातल्या रणजीत कटय़ालची भूमिका गाजवल्यानंतर रुस्तम पावरी ही देखील सत्यकथेवर आधारित भूमिका अक्षयने यशस्वी करून दाखवली आहे.
या वर्षी अक्षयने केलेल्या सर्वच चित्रपटाने तिकीट खिडकीवर १०० करोड रुपयांचा किंवा त्यापेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. हा अक्षयच्या नावावर झालेला नवा विक्रम आहे. जे कोणत्याही कलाकाराला जमले नाही. बॉलिवूडच्या ३ खानांना देखील जे करता आले नाही ते खिलाडी अक्षयने केले आहे.
एका वर्षात सलग ३ चित्रपट, तिकीटबारीवर १०० करोडचा व्यवसाय. अक्षय वर्षातून ४-५ चित्रपट करत असतो, त्यामधील त्याचे ३ तरी चित्रपट चांगला व्यवसाय करतात. वर्षाच्या सुरुवातीला एअरलिफ्ट, त्यानंतर हाऊसफूल ३ आणि आता रुस्तम असे तीन चित्रपट हीट दिले आहेत. रुस्तम हा अक्षयचा सहावा चित्रपट आहे ज्याने १०० करोडचा व्यवसाय केला आहे. यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणा-या पहिल्या पाच चित्रपटांच्या यादीत अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे.
” जावई माझा भला ” असं डिम्पल कपाडिया सध्या म्हणत असेल .!