लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दणका दिला आहे..
मुंबई- लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दणका दिला आहे. सत्यपाल सिंह यांनी राजाच्या मंडपातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत. महिलांशी आणि भक्तांशी गैरवर्तन करणा-या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत सिंह यांनी दिले आहेत.
दरम्यान लालबागच्या राजाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करून कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मनोज मिश्रा या कार्यकर्त्यांला सोमवारी काळाचौकी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर मंगळवारी त्याची सुटका केली.
मात्र, पोलिसांसोबत झालेले धक्काबुक्कीचे प्रकार व भक्तांच्या अवमानाच्या घटना पुढे आल्यामुळे मंडळाच्या मुजोर कार्यकर्त्यांविरोधात नागरीकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक शरमळे लालबागच्या राजाच्या सुरक्षेसाठी तैनात असताना मंडळाचा कार्यकर्ता मिश्रा याने त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या कामात अडथळा निर्माण करून त्यांच्याशी अरेरावीने वागला.
त्यानंतर शरमळे यांनी याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मिश्राला अटक केली. मंगळवारी दुपारी त्याला स्थानिक दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. याशिवाय एका महिला पोलिस शिपायालाही धक्काबुक्की झाल्याची घटना पुढे आली आहे.
मात्र, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या या मुजोर वागणुकीमुळे सामान्य नागरीकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. कार्यकर्ते मोठे की गणपती, याचा विसर पडता कामा नये. एवढी रांग लावून गणपतीचे दोन सेकंदही दर्शन करायला मिळणार नसेल, तर काय उपयोग, असा प्रश्न राजाच्या दर्शनासाठी आलेले गणेशभक्त विजय एकुंडे यांनी उपस्थित केला.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ते किती माजोरडे आहेत ह्याची प्रचिती पोलिसांना, बंदोबस्तासाठी रविवारी ड्युटीवर असलेल्या पोलिस सब इन्स्पेक्टरना मारहाण केल्याबद्दल झाली काय? आणी फक्त एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त देत आहेत, सगळ्यानी ह्या माजोरड्या कार्यकर्त्यांचा प्रकार विवीध वृत्तवाहीनींवर, इंटरनेटवर बघितला, हे सर्व करताना ही कार्यकर्ते मंडळी तल्लीन (की टल्लीन) झाली होती कुणास ठाऊक, की आपण एक पुरुष आहेत हे पण ती विसरली होती आणी म्हणूनच की काय, एखाद्या कसायासारखे त्यांच्या समोर आलेल्या, मुली, महिलांना एखाद्या गुराढोराप्रमाणे खेचत होती. आपण एका महिलेला, एका तरुण मुलीच्या विवीध अंगांना हात लावतोय ह्याचे जरा सुध्दा भान नव्हते ह्या भाड्यांना. साल्याला सगळ्यां महिलांनी मिळून शोधले पाहीजे आणी चांगले चोपले पाहिजे.
पोलिस लालबागचा राजाचे दर्शन घेताना महिलांशी असभ्य, अभद्र वर्तनाचे व्हिडीओ फुटेज बघण्यासाठी कुठल्या मुहूर्ताची वाट वगैरे बघत बसले आहेत की काय असा प्रश्न पडतो. ह्या कार्यकर्त्यांचे महिलांशी असभ्य वर्तन थांबवची वाट कसली बघत बसले आहे. लालबागचा राजाचे दर्शन घेताना महिलांशी झालेले हे असभ्य वर्तन, अभद्र वर्तन हे “महिलांच्या विनयभंगाचा” प्रकार नाही का वाटत आबांना आणी त्यांच्या गृह खात्याला आणी सर्व दर्शनाभिलाषी भक्त मंडळींना? नसेल वाटत तर, श्रध्देचा, अंधश्रध्देचा भाग सोडा, भक्त मंडळींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, कुठलेही देवस्थान, मंदिरे, गणेशोत्सव – नवरात्रोत्सव असो की कुठले स्वंय:घोषित पीठाधीपती, पीठाधीश, महाराज असो की कुठले बापू, ह्यांची स्वत:चीच प्रगती, धंदे, दुकाने ही तुमच्या आमच्या सारख्या निर्बुध्द भक्तमंडळींवरच अवलंबून आहे, म्हणून आप-आपली डोकी बाजूला ठेवा आणी स्वत:चा कपाळमोक्ष त्या महागणपतीच्या पायाशी करुन घेताना म्हणा “त्वं प्रत्यक्षं ब्रम्हासि॥ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ॥…”